देवगंधर्व महोत्सव
दर्जेदार शास्त्रीय संगीताची २४ गौरवशाली वर्षे
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत विश्वात मानाचे स्थान मिळवलेला प्रतीवार्षिक सोहळा म्हणजे देवगंधर्व महोत्सव. कल्याण गायन समाजाच्या हिरक महोत्सवानंतर या महोत्सवाचा श्रीगणेशा करण्यात आला. प्रतिवर्षी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात साजऱ्या होणाऱ्या या महोत्सवाची शास्त्रीय संगीताचे दर्दी रसिक आणि कलाकारदेखील आतुरतेने वाट पहात असतात.
आजपर्यन्त या महोत्सवात भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. त्यात स्व. खांसाहेब अब्दुल करीमखान, उस्ताद फैयाज खान, मास्टर कृष्णराव, बडे गुलाम अली खान, श्रीमती हिराबाई बडोदेकर, पं. कुमार गंधर्व, पं. भीमसेन जोशी, उस्ताद अली अकबर खान, उस्ताद झाकीर हुसेन, पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. शिवकुमार शर्मा, श्रीमती किशोरी आमोणकर, श्रीमती प्रभा अत्रे, श्रीमती मालिनी राजुरकर अशा अनेक महान कलाकारांचा समावेश आहे.
या दिग्गज कलाकारांनी आपल्या सादरीकरणाने महोत्सवाला एक आगळेवेगळे परिमाण दिले असून महोत्सव एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवला आहे.


गेल्या अनेक वर्षांत या महोत्सवात भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे.
गुरु-शिष्य परंपरा :
अविनाशी गुरु-शिष्य परंपरेला अभिवादन म्हणून या महोत्सवात विषयाधारित मैफिली आयोजित केल्या जातात. या मैफिलींमधून संगीत क्षेत्रातील मार्गदर्शन व परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले जाते. उदाहरणादाखल त्यात सादर झालेले कार्यक्रम खालीलप्रमाणे
- पं. उल्हास कशाळकर आणि पं. राम देशपांडे
- पं. हरिप्रसाद चौरसिया आणि सुनील आवचट
नृत्यप्रस्तुती
देवगंधर्व महोत्सवात भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकारांचेही सादरीकरण झाले आहे. या मंचावर आपली कला सादर करणाऱ्या नामांकित कलाकार असे आहेत.
- डॉ. कनक रेळे
- झेलम परांजपे (ओडिसी)
- अर्चना जोगळेकर (कथक)
- अदिती भगवत (कथक)
- सोनिया पर्चुरे (कथक)
- शर्वरी जमेनीस (कथक)
- विशाल कृष्ण (कथक)




















