सरत्या शतक भराच्या कालावधीत कल्याण गायन समाजाने भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील बहुतेक सर्व दिग्गज कलाकारांचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यात
- खाँसाहेब अब्दुल करीम खाँ,
- उस्ताद फैयाज खाँ,
- मास्टर कृष्णराव,
- बडे गुलाम अली खाँ,
- श्रीमती हिराबाई बडोदेकर,
- पं. कुमार गंधर्व,
- पं. भीमसेन जोशी,
- उस्ताद अली अकबर खाँ,
- उस्ताद झाकीर हुसेन,
- पं. हरिप्रसाद चौरसिया,
- पं. शिवकुमार शर्मा,
- श्रीमती किशोरी आमोणकर,
- श्रीमती प्रभा अत्रे,
- श्रीमती मालिनी राजुरकर
आणि इतर अनेक महान कलाकारांचा समावेश आहे. साहित्यिक, राजकीय नेते, कलाकार, समाजसुधारक अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर रसिकांनी समाजाच्या सांस्कृतिक योगदानाचे कौतुक केले आहे.


























