दिनकर संगीत विद्यालय
१९४४ पासून शास्त्रीय संगीतातील पिढ्यांची जडणघडण
एप्रिल १९४४ मध्ये स्थापन झालेल्या दिनकर संगीत विद्यालयाचे ध्येय होते, विद्यार्थ्यांच्या अंगभूत प्रतिभेचा विकास करणे तसेच कल्याण-डोंबिवली परिसरात भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार, प्रसार आणि रुची निर्माण करणे.
गेल्या ८१ वर्षांहून अधिक काळ या विद्यालयाने शास्त्रीय संगीत शिक्षणाचा पाया दृढ केला आहे. मन:शांती, प्रेरणा तसेच एकजूट निर्माण करण्याच्या संगीताच्या परिवर्तनकारी शक्तीवर आमचा अढळ विश्वास आहे.
संगीत प्रवासात तुम्ही नवखे असा किंवा एका विशिष्ट उंचीवर पोहोचून प्राविण्य मिळवू इच्छित असा, दिनकर संगीत विद्यालय सर्व वयोगटातील व सर्व स्तरांवरील विद्यार्थ्यांना अगत्यशील व सहकार्यपूर्ण वातावरणात शास्त्रीय कलांच्या समृद्ध परंपरेचा भाग होण्याची संधी देते.
आजमितीस सुमारे ५०० विद्यार्थी आमच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय प्रशिक्षण घेत आहेत आणि उत्कटता, शिस्त व उत्कृष्टतेवर आधारलेली शास्त्रीय संगीताची परंपरा नेटाने पुढे नेत आहेत.
ध्येय
नव्या पिढीतील कलाकारांना घडवत असतानाच भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरादेखील जतन करणे हे दिनकर संगीत विद्यालयाचे ध्येय आहे.
तज्ञांच मार्गदर्शन, विविध आकर्षक मैफिली यांच्या माध्यमातून आम्ही सर्जनशीलता, शिस्त आणि संगीताविषयी निरंतर प्रेम यांचा विकास साधण्याचा प्रयत्न करतो.

संगीतवर्गाचे लाभ
तज्ज्ञ शिक्षकवर्ग
अनुभवी व उच्चशिक्षित संगीतकार, नर्तक/नर्तकी आणि शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय कलांमध्ये परंपरा व नवोन्मेष यांचा समतोल साधत शिक्षण दिले जाते.
सर्वसमावेशक अभ्यासक्रम
आमचा अभ्यासक्रम प्रत्येक टप्प्यातील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आला आहे—जिज्ञासू नवशिक्यांपासून ते प्रगत साधकांपर्यंत सर्वांना आम्ही खालील कलांमध्ये प्रशिक्षण देतो:
- शास्त्रीय गायन
- तबला
- हार्मोनियम
- बासरी
- कथक
- भरतनाट्यम
- चित्रकला
वैयक्तिक सादरीकरणाची संधी
विद्यार्थ्यांना नियमितपणे मैफिली, स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी होण्याची संधी मिळते. आमचा प्रमुख वार्षिक सोहळा “जलसा” तसेच – गुरुपौर्णिमा उत्सव” संपूर्ण शिष्यवर्गाला गुरु-शिष्य परंपरेच्या माध्यमातून एकत्र आणतो.
. आमचा प्रमुख वार्षिक सोहळा “जलसा” तसेच – गुरुपौर्णिमा उत्सव” संपूर्ण शिष्यवर्गाला गुरु-शिष्य परंपरेच्या माध्यमातून एकत्र आणतो.
आमच्या प्रख्यात शिक्षकांना भेटा
आमच्या फॅकल्टीमध्ये आदरणीय कलाकार आणि शिक्षकांचा समावेश आहे जे अनेक दशकांचा अनुभव घेऊन येतात आणि कलाकारांच्या पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्याची सखोल वचनबद्धता देतात..

स्वप्नील भाटे (मुख्याध्यापक)
- संगीतातील शिक्षण: तबला विशारद
- गुरू: श्री व्ही.बी. अळोणी
पं. विभव नागेशकर
ताल योगी पं. सुरेश तळवलकर

अनिरुद्ध दिलरुबा गोसावी
- संगीतातील शिक्षण: हार्मोनियममध्ये संगीत विशारद
- गुरू: दिलीप गोसावी, प्रमोद मराठे, सुधीर नायक

कौस्तुभ दत्तात्रेय आपटे
- संगीतातील शिक्षण: संगीत विशारद
- गुरू: डॉ. राम देशपांडे व पं. मधुकर जोशी

हर्षल प्रसाद काटदरे
- संगीतातील शिक्षण: ललित कला केंद्र , पुणे येथून बी.ए. संगीत आणि शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर येथून एम.ए. संगीत
- गुरू: श्री. प्रसाद काटदरे
श्री. राजाराम शेंबेकर
पंडित विश्वनाथ कानहेरे
पंडित प्रमोद मराठे
श्री. अनंत जोशी

मेघना भावे
- संगीतातील शिक्षण: एम.ए. संगीत
- गुरू: कै. श्रीमती पद्मावती शालिग्राम गोखले, कै. पं. दिनकर पानशिखर, डॉ. आशा पारसनीस जोशी.

मनीषा दीपक घारपुरे
- संगीतातील शिक्षण: संगीत विशारद, संगीत अलंकार, नाट्यसंगीत डिप्लोमा, लाईट म्युझिक डिप्लोमा
- गुरू: पं. सुरेश बापट, श्रीमती वंदना भागवत, पं. मधुकरबुवा जोशी

प्रशांत बनिया
- संगीतातील शिक्षण: बासरीमध्ये संगीत विशारद
- गुरू: मझहर शेख / विवेक सोनार

संगीता श्रीरंग साठे
- संगीतातील शिक्षण: भरतनाट्यम 'विशारद पूर्ण'
- गुरू: श्रीकृष्ण मणी / गुरू विक्रमन पिल्लई

स्नेहलकुमार गणेश धामपूरकर
- संगीतातील शिक्षण: तबला अलंकार आणि तबलामध्ये एम.पी.ए.
- गुरू: पं. चंद्रशेखर वाझे
पं. राजेंद्र अंतारकर
पं. आदित्य कल्याणपूर

तन्मय आपटे आत्रे
- संगीतातील शिक्षण: भरतनाट्यममध्ये अलंकार
- गुरू: कै. श्रीमती पूनम मुर्देश्वर
श्रीमती तमन्ना नायर

मृदुला साठे
- संगीतातील शिक्षण: एम.एफ.ए. संगीत अलंकार
- गुरू: पं. वाय.टी. वैद्य, पं. मधुकर जोशी, डॉ. आशा पारसनीस जोशी.

ईशान आनंद भाट
- संगीतातील शिक्षण: विशारद पूर्ण
- गुरू: श्री स्वप्नील भाटे

क्षमा कुलकर्णी
- संगीतातील शिक्षण: कथ्थक मध्ये नृत्यालयंकार, कथ्थक मध्ये एम.ए.
- गुरू: डॉ. वैशाली दुधे



















